Quora का आहे

“जागतिक ज्ञानाची देवाणघेवाण करणे आणि व्याप्ती वाढविणे“, हे Quora चे उद्दिष्ट आहे. अनेकांसाठी अत्यंत उपयुक्त असलेले अमर्यादित ज्ञान सध्या केवळ काही लोकांपुरतेच मर्यादित आहे - हे ज्ञान काही व्यक्तिंच्या मेंदूत बंदिस्त आहे किंवा निवडक गटांसाठीच उपलब्ध आहे. ज्या व्यक्तिंकडे ज्ञान आहे आणि ज्यांना ज्ञानाची आवश्यकता आहे, अशा लोकांना आम्हाला एकमेकांशी जोडायचे आहे. जेणेकरुन वेगवेगळा दृष्टीकोन असलेले लोक एकत्र येतील, जे एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतील आणि स्वत:कडील ज्ञानाची देवाणघेवाण करून उर्वरित जगाच्या फायद्यासाठी एकमेकांना सक्षम बनवतील.

प्रश्नासमवेत राहा

प्रश्न हे Quora चं हृदय आहे. प्रश्न - जे जगावर परिणाम करतात, प्रश्न - जे ताज्या जागतिक घडामोडी समजावून सांगतात, प्रश्न - जे आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत करतात, आणि प्रश्न - इतर लोक वेगळा विचार का करतात हे समजून घेण्यासाठी मार्गदर्शन करतात. Quora हे एक असे व्यासपीठ आहे जिथे तुम्हाला महत्त्वाचे वाटणारे प्रश्न विचारू शकता आणि त्यांची विलक्षण उत्तरं मिळवू शकता.

Quora कडे प्रत्येक प्रश्नाची फक्त एक आवृत्ती आहे. यात डाव्या विचारसरणीची आवृत्ती, उजव्या विचारसरणीची आवृत्ती, पाश्चिमात्य आवृत्ती आणि पूर्वेकडील आवृत्ती नाही. एकाच प्रश्नाचं उत्तर मिळविण्यासाठी आणि एकमेकांपासून शिकता यावं यासाठी Quora जगभरातील वेगवेगळ्या लोकांना एकत्र आणतं. आम्हाला Quora ला एक असे व्यासपीठ बनवायचे आहे, जिथे तुम्ही मोकळेपणाने तुमची मतं मांडू शकता, कारण Quora वर चर्चा घडत असतात. Quora वरील उत्तर हे कायम प्रत्येकासाठी एक समाधानकारक उत्तर असावे अशी आमची इच्छा आहे.

जग आणि जगातील माणसांना समजून घ्या

Quora वर असा मजकूर आहे जो वाचून तुम्हाला आनंद मिळेल. जग ज्याप्रमाणे चालतं, ते तसं का चालतं हे समजून घेण्यासाठी Quora तुम्हाला मदत करेल, लोक ज्याप्रमाणे वागतात ते तसे का वागतात, आणि जग अधिक चांगलं बनविण्यासाठी आपण काय करू शकतो हे समजून घेण्यास Quora तुम्हाला मदत करतं. Quora प्रश्नांची सखोल उत्तरं तुमच्या वैयक्तिक फीडवर प्रदान करतं. असे प्रश्न, जे विचारले जाऊ शकतात याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.

Quora वर अशा लोकांकडून उत्तरं दिली जातात, ज्यांना समस्यांची जाण आहे आणि त्याबाबतचं प्रत्यक्ष ज्ञान आहे. Quora हे असे व्यासपीठ आहे जिथे बराक ओबामांची इराणच्या कराराबाबतची भूमिका, कारागृहातील कैद्यांचे आयुष्य, जागतिक तापमान वाढीबद्दल शास्त्रज्ञांचे विचार, चोरांना अटकाव कसा घालावा याबाबतचे पोलिस अधिका-यांचे मत आणि कार्यक्रम कसे तयार केले जातात याबाबतचे टीव्ही निर्मात्यांचे म्हणणे काय आहे, हे वाचता येऊ शकतं. Quora हे ग्लोरिया स्टीनेम, स्टीफन फ्राय, हिलरी क्लिंटन, ग्लेन बेक, शेरिल सॅन्डबर्ग, विनोद खोसला आणि जिल्लियन अँडरसन यांसारख्या प्रेरणादायी लोकांना वाचण्याचे व्यासपीठ असून, त्यांच्याकडून लोकांना कायम हव्या असलेल्या प्रश्नांची उत्तरंही थेट येथेच दिली जातात. ज्या लोकांपर्यंत तुम्ही कोणत्याही मार्गाने पोहचू शकत नाही, अशा लोकांनी कधीही आणि कुठेही सामायिक न केलेली महत्त्वाची माहिती तुम्ही Quora वर वाचू शकता.