सेवा विषयक अटी

Quora च्या सेवा विषयक अटींचा परिचय

Quora मध्ये स्वागत आहे! आमच्या सेवा विषयक अटींच्या ठळक वैशिष्ट्यांचा थोडक्यात सारांश खालीलप्रमाणे आहे:

 • ‘जागतिक ज्ञानाची देवाणघेवाण करणे आणि व्याप्ती वाढविणे’, हे आमचे उद्दिष्ट आहे. Quora व्यासपीठ हे प्रश्न विचारण्याचे, विलक्षण बुद्धीमत्ता आणि दर्जेदार उत्तरांचे योगदान देणाऱ्या लोकांना जोडणारे व्यापीठ आहे. यामुळे लोक एकमेकांपासून शिकतात आणि जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजावून घेण्यास सक्षम होतात.
 • आपण पोस्ट केलेल्या माहितीचे मालक आपणच असता; आपण आम्हाला आणि Quora च्या व्यासपीठावरील इतरांना देखील काही विशिष्ट हक्क आणि परवानगी देत असता. या परवान्याचा तपशील हा खाली विभाग 3(C) मध्ये स्पष्ट करण्यात आला आहे.
 • आपण पोस्ट करीत असलेल्या माहितीस आपण जबाबदार आहात. पोस्ट करण्यासाठी आवश्यक असलेले अधिकार तुम्हाला असतील आणि आपल्या माहितीने दुसऱ्या पक्षाच्या कायदेशीर हक्कांचे (उदाहरणार्थ, बदनामी) किंवा अन्य कोणत्याही लागू असलेल्या कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची खात्री करणे, याचा यामध्ये समावेश असेल.
 • आपण Quora वरील माहितीला अन्यत्र पुन्हा पोस्ट करू शकता, परंतु आपण माहितीला Quora च्या व्यासपीठावर निर्देशित कराल आणि कोणत्याही “पुनरुत्पादनासाठी किंवा इतर ठिकाणावर वापरली जाऊ नये” यांसारख्या सर्व बाबींसह मूळ पोस्ट करणाऱ्याच्या अधिकारांचा आदर कराल.
 • आम्ही वापरकर्त्यांनी पोस्ट केलेल्या माहितीची पुष्टी किंवा पडताळणी करीत नाही. आमची माहिती आणि साहित्य हे तुम्हाला जसे आहे तसे, कोणत्याही हमीशिवाय दिले जाते. Quora व्यसपीठावरील आपण स्वतः करीत असलेल्या वापराविषयी आपण स्वतः पूर्णपणे जबाबदार आहात. वकील, डॉक्टर्स, आणि अन्य व्यावसायिकांच्या पोस्टना आपल्या विशिष्ट परिस्थितीतल्या व्यावसायिक सल्ल्यास पर्यायी म्हणून समजले जाऊ नये.
 • आपण आमच्या व्यासपीठाच्या नियमांना फॉलो करण्यास संमती देता. आपण जेव्हा Quora व्यासपीठाचा वापर कराल तेव्हा, आपण आमच्या सेवा विषयक अटींना देखील संमती देता, आमच्या गोपनीयता धोरणा ला स्वीकारता, आणि आमच्या स्वीकार्य वापर धोरण, कॉपीराईट धोरण, आणि ट्रेडमार्क धोरण यांना फॉलो करण्यास संमती देता.
 • आम्ही आपणाला अभिप्राय देण्यास आणि तक्रारी नोंदविण्यास साधने/टूल्स उपलब्ध करून देतो. आपल्या बौध्दिक मालमत्ता हक्कांचे, अन्य कायद्याचे, किंवा Quora च्या धोरणाचे, कोणी उल्लंघन केले आहे, असे आपणाला वाटत असल्यास, आपण संपर्क पोर्टंल या लिंकवर जाऊन किंवा आमच्या इन-प्रॉडक्ट रिपोर्टिंग टूल मध्ये जाऊन तक्रार नोंदवू शकता.

आपण Quora व्यासपीठामध्ये सामील होऊ इच्छिता याचा आम्हास आनंद झाला आहे आणि आम्ही आपणाला सेवा विषयक अटी पूर्णपणे वाचण्यासाठी सूचित करत आहोत.

Quora च्या सेवा विषयक अटी

शेवटी अपडेट केल्याची तारीख: 23 ऑक्टोबर 2018

Quora मध्ये आपले स्वागत आहे! Quora हे व्यासपीठ ज्ञान मिळविण्यास आणि व्याप्ती वाढविण्यासाठी, लोकांना इतरांकडून शिकण्यास आणि जगाला चांगल्या प्रकारे समजून घेण्यास सक्षम करण्यासाठी आहे.

या सेवा अटी (“सेवा अटी”) तुम्ही आणि Quora, Inc.(“Quora” “आम्ही” किंवा “आम्हाला”) करारनाम्याला (“करारनामा”) पुढे करतो. तो आम्ही आपणाला आमच्या वेब आणि अॅप्लिकेशन(अऩुप्रयोग ) (एकत्रितरित्या “Quora व्यासपीठ”) यांच्या माध्यमातून तुमच्या उत्पादनाच्या आणि सेवांच्या तुमच्याकडल्या वापरांचे नियमन करतो.

कृपया खात्री करा की तुम्ही ते वाचता, कारण, Quora व्यासपीठ वापरून, तुम्ही या अटींना समंती देता.

 1. आमचा मिशन

  जगामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण करून व्याप्ती वाढविणे हे आमचे ध्येय आहे. Quora व्यासपीठ हे प्रश्न विचारण्याचे आणि विलक्षण बुद्धीमत्ता आणि दर्जेदार उत्तरे यांचे योगदान देणाऱ्या लोकांना जोडण्याचे ठिकाण आहे. यामुळे लोक एकमेकांपासून शिकण्यास आणि जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजावून घेण्यास सक्षम होतात.
 2. Quora व्यासपीठ वापरणे
  1. ते कोण वापरू शकते. 13 वर्षाखालील कोणीत्याही व्यक्तीस Quora व्यासपीठाचा वापर करण्यास प्रतिबंध आहे. आपण ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणच्या कायद्यानुसार तुम्ही कमीत कमी सज्ञान वय पूर्ण केले असेल व जर तुम्ही ते पूर्ण करत नसल्यास, तुमच्या पालकांनी किंवा कायदेशीर पालकांनी त्या सेवा अटी ना संमती देणे आवश्यक आहे आणि तुमच्यावतीने या करारनाम्याला मान्यता देऊन ते याची पुष्टी करण्यात आणि हे (व्यासपीठ इत्यादी) तुम्ही वापरण्याविषयीची जबाबदारी घेतात.
  2. नोंदणी. Quora व्यासपीठावर आपण एक प्रोफाईल सेट करता, तेव्हा आपणाला तुमच्याबद्दल विशिष्ट माहिती प्रदान करण्यास सांगितले जाईल. Quora व्यासपीठावर आपण आपले खाते तयार करताना आपल्या खऱ्या नावासह, अचूक माहिती प्रदान करण्यास संमती दिली आहे. आपण प्रदान केलेल्या माहितीला आमच्या गोपनीयता धोरणा ला विवेकसंमत नोंदणीकरणाचा भाग म्हणून समजण्यात येईल. आपल्या पासवर्डची गुप्तता राखण्याची जबाबदारी आपण स्वतः घेणे आवश्यक आहे.
  3. गोपनियता धोरण. आमच्या गोपनियता धोरण. यामध्ये आमच्या गोपनीयतेच्या पद्धतीना पुढे मांडण्यात आलेले आहे. Quora च्या व्यासपीठाचा वापर करून, आपण आमच्या गोपनीयता धोरणाला, आपण नोंदणी केलेले वापरकर्ता असला किंवा नसला तरीही, स्विकारता.
  4. स्वीकारार्य वापर धोरण. Quora व्यासपीठावर इतरांबरोबरच्या संवादामध्ये, तुम्ही स्वीकारार्य वापर धोरणा चे सदैव फॉलो करण्याचे मान्य करता.
  5. रद्दता. खाते सेंटिग्जमध्ये जाऊन आपण कोणत्याही क्षणी आपले खाते बंद करू शकता आणि आपले खाते अकार्यान्वित करू शकता. आपण जर कोणत्याही Quora च्या धोरणाचे उल्लंघन केल्यास किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी आम्ही आपले खाते रद्द किंवा तात्पुरते स्थगित करू शकतो.
  6. Quora व्यासपीठामध्ये बदल. आम्ही नेहमीच आपला Quora च्या व्यासपीठावरील अनुभव सुधारण्यासाठी प्रयत्न करीत असतो. आम्हाला वैशिष्ट्ये जोडण्याची किंवा बदलण्याची गरज पडू शकते आणि आम्ही ते तुम्हाला न कळविता करू शकतो.
  7. अभिप्राय. आम्ही आपल्या अभिप्रायाचे आणि Quora व्यासपीठामध्ये कशी सुधारणा करावी याबद्दल आपल्या सूचनांचे स्वागत करतो. विनासंकोच quora.com/contact येथे अभिप्राय सादर करा. अभिप्राय सादर करून, आपण आम्हाला हक्क देण्याचे, आपल्या स्वेच्छेने, तो वापरण्यास, प्रकट करण्यास आणि इतरांना अभिप्रायाचे, संपूर्ण किंवा काही भागाचे, मुक्तपणे आणि आपणाला कोणतीही भरपाई न देता पूनर्वेक्षण करू देण्याचे मान्य करता.
 3. आपली माहिती
  1. आपल्या माहितीची व्याख्या. Quora व्यासपीठावर आपणाला इतरांबरोबर शेअर करण्यासाठी पोस्ट, मजकूर, छायाचित्र, व्हिडीओ, लिंक्स आणि फाईल समाविष्ट करण्यास मदत करतो. आपण Quora व्यासपीठाच्या माध्यमातून किंवा अन्य ठिकाणी अपलोड, प्रकाशित किंवा प्रदर्शित केलेल्या सर्व माहितीला एकत्रितपणे “आपली माहिती म्हणून संबोधले जाते.” Quora व्यासपीठ वापरून त्याचा भाग बनून, आपली माहिती सर्वसामान्य लोकांद्वारे पाहिली जाऊ शकते, हे आपणाला माहित आहे आणि ते कबूल करत आहात.
  2. मालकी. आपण, किंवा आपला परवानादाता, आपल्या माहितीमध्ये, खाली आम्हाला देऊ केलेल्या अन-अपवर्जक अधिकारांच्या अधीन राहून, जसे लागू असेल, तसे कॉपीराईट आणि अन्य बौद्धिक संपदेची मालकी स्वतःकडे ठेवता.
  3. आपली माहिती वापरण्याचा परवाना आणि परवानगी.
   1. Quora व्यासपीठावर आपली माहिती जमा करून, पोस्ट करून किंवा प्रदर्शित करून, आपण Quora आणि त्याच्या संलग्न कंपन्यांना एक नॉन-एक्स्ल्युझिव्ह नसलेली, जगभरात, रॉयल्टी फ्री, पूर्णपणे देय केलेली, हस्तांतरणीय, उप परवाना (एकाधिक स्तरांच्या मधून), वापरण्याचा परवाना, कॉपी करणे, पुर्नउत्पादन, स्वीकारण्यास, दुरूस्ती करणे, त्याच्यापासून साधित कार्य करून, प्रकाशित करणे, हस्तांतरित करण्यास साठवून, प्रदर्शित करणे आणि वितरीत करणे, भाषांतरित करणे, पत्रव्यवहार करणे आणि अन्यथा आपली माहिती Quora व्यासपीठाच्या वापरासाठी किंवा ऑपरेशनसाठी किंवा प्रमोशनसाठी, जाहिरातीसाठी किंवा Quora व्यासपीटाच्या किंवा व्यावसायिक भागिदारांच्या मार्केटिंगसाठी, कोणत्याही आणि सर्व माध्यमांमध्ये किंवा वितरण पद्धतींमध्ये ( आता ज्ञात असलेल्या किंवा नंतर विकसित केल्या जाणाऱ्या) वापरण्याची परवानगी देता. आपण मान्य केले आहे की या परवाना (लायसन्स)मध्ये Quora साठी आपली माहिती अन् कंपन्या, संघटना, व्यावसायिक भागिदार, किंवा अन्य व्यक्तिगत ज्यांचा Quora सोबत समूहनास, प्रसारित करण्यास, पत्रव्यवहार करण्यास आणि आपली माहिती Quora व्यासपीठावर किंवा अन्य माध्यमातून किंवा वितरणाच्या पद्धतीतून लोकांना उपलब्ध करू देण्यास, वितरीत करण्यास किंवा प्रकाशित करण्यास सहयोग करतात, यांचा समावेश आहे. या परवान्यामध्ये Quora व्यासपीठाच्या अन्य वापरकर्त्यांसाठी आमच्या सेवा अटींच्या अधीन राहून, वापर करण्याचा, कॉपी करण्याचा, पुर्नउत्पादित करण्याचा, स्विकारण्याचा, दुरूस्ती करण्याचा, त्याच्यापासून साधित कार्य करून, प्रकाशित करणे, हस्तांतरित करणेस साठवून, प्रदर्शित करणे आणि वितरीत करणे, भाषांतरित करणे, पत्रव्यवहार करणे आणि आपली माहिती लोकांना उपलब्ध करून देण्याच्या अधिकाराचा देखील समावेश आहे. आपल्या उत्तराचे भाषांतर अन्य वापरकर्त्यांनी करू नये अशी आपली इच्छा असल्यास, आपल्या प्रोफाईल सेटिग्ज मध्ये सार्वत्रिक भाषांतराच्या पर्यायाला न स्विकारण्याला निवडू शकता किंवा काही उत्तरांचे भाषांतर केले जाऊ नये असे निर्देशित करू शकता.
   2. एकदा आपण प्रश्नाचे उत्तर पोस्ट केले की तुम्ही आपल्या उत्तराला केव्हाही, अपवाद जर उत्तराला निनावी पोस्ट केले असल्यास त्याला वगळून http://www.quora.com वर सार्वजनिक प्रदर्शनापासून संपादित किंवा हटवू शकता. तरीसुद्धा, आम्ही उत्तराच्या सिंडिकेटेड चॅनेलवर किंवा www.quora.com च्या बाहेर यापूर्वी वितरीत करण्याच्या अन्य पद्धतीवर प्रदर्शित करण्याला काढून टाकण्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही. Quora आपल्या उत्तरातून संशयित स्पॅमना काढू शकतो. आपण प्रश्न पोस्ट केल्यानंतर, तो अन्य वापरकर्ते किंवा Quora द्वारे कोणत्याही वेळी संपादित किंवा हटविला जाऊ संपादित केला जाऊ शकतो किंवा काढून टाकला जाऊ शकतो. आपण केलेले संपादित आणि केलेले कोणतेही बदल अन्य वापरकर्त्यांचा दिसू शकतील. Quora ला आपण पोस्ट केलेल्या कोणत्याही प्रश्नांची नक्कल करणे, प्रदर्शित करणे, स्थलांतरीत करणे, प्रकाशित करणे, संपादीत करणे, वितरीत करणे, साठविणे, दुरूस्ती करणे आणि अन्यथा वापरणे यांचा अधिकार, आणि त्या अधिकारांना इतरांना पुढे देऊ करणे, हे कायद्याप्रमाणे परवानगी दिलेल्या कमाल मर्यादेपर्यंत, अपवाद अन्यथा जसे या करारनामध्ये निर्देशित करण्यात आले आहे, ते वगळून, अखंड आणि रद्द न करता येण्याजोगे असेल.
   3. आपण मान्य करता आणि पोच देता की, Quora आपल्या माहितीचे संरक्षण करेल व आपली माहिती तसेच त्याच्या संदर्भातील तपशील जर कायद्याने आवश्यक असल्याचे वाटल्यास किंवा चांगल्या अर्थाने असे साठवून ठेवणे किंवा प्रकट करणे हे वाजवीरित्या आवश्यक असल्यास: (a) ते कायदेशीर असल्याचे, लागू होणार्‍या कायदे आणि प्रशासकीय विनंत्यांना उद्देशून असल्याचे; (b) या सेवा अटींची अंमलबजावणी करत असल्याचे; (c) आपली माहिती कुठल्याही तृतीय पक्षांच्या कायद्यांचे उल्लंघन करत असल्याच्या दाव्यांना उत्तर देत असल्यास; (d) आढळून आणणे, टाळणे किंवा त्याऐवजी फसवणुक, सुरक्षितता किंवा तांत्रिक समस्या निदर्शनास आणून देणे; किंवा (e) Quora चे अधिकार, मालमत्ता किंवा त्याच्या वापरकर्त्यांच्या अथवा जनतेची सुरक्षा करते.
   4. आपणास याची जाणीव आहे की, आम्ही त्यात सुधारणा करू हे तुम्ही समजू शकता, स्वीकार, किंवा कार्य तयार करण्यास जी आपली माहिती संगणक नेटवर्क्स, डिव्हाइसेस, सेवा प्रदाता, आणि विविध माध्यमांमध्ये हस्तांतरित, प्रदर्शित किंवा वितरीत करते जी हस्तांतरित करण्यास, प्रदर्शित किंवा ती कम्प्युटर नेटवर्कवर वितरीत करणे, साधन, सेवा प्रदाता आणि विविध माध्यमांमध्ये, आम्ही आपली माहिती, संपूर्णपणे किंवा त्याचा काही भाग, कोणत्याही वेळी काढू शकतो किंवा प्रकाशित करण्यास नाकारू शकतो.
   5. आपण आम्हाला पुढे जाऊऩ निरपेक्ष पक्षाद्वारे आपल्या माहितीपैकी कोणतीही माहिती Quora व्यासपीठाच्या बाहेर कोणत्याही अनधिकृत वापराच्या किंवा आमच्या सेवा अटीच्या उल्लंघनाच्या विरोधात अंमलबजावणीची कारवाई करण्यास आपले नॉन-एक्स्ल्युझिव्ह एजंट म्हणून देता अशी परवानगी आणि प्राधिकृत करता.
  4. आपल्या माहितीसाठी आपल्या जबाबदाऱ्या. Quora व्यासपीठावर आपली माहिती पोस्ट करून, आपण आम्हाला सादर आणि हमी देता की: i) आपणाकडे जसे या करारनाम्याच्या खाली आपण प्रदान केलेल्या आपल्या माहितीचा वापर करण्यासाठी आणि आम्हाला आपली माहिती वापरू देण्याचा अधिकार देण्यासाठी, त्याची मालकी, अधिकार, किंवा आवश्यक असलेले सर्व परवाने किंवा परवानग्या कोणत्याही आवश्यक त्या पक्षांकडून घेतलेले आहेत, ते आपल्याकडे आहेत, आणि ii) आपली माहिती पोस्ट केल्याने कोणत्याही बौद्धिक संपदेच्या किंवा इतरांच्या व्यक्तिगत हक्कांचे किंवा अन्य कोणत्याही लागू असलेल्या कायद्याचे किंवा विनियमकांचे उल्लंघन होत नाही. आपल्या माहितीच्या संदर्भात आपण बौध्दिक संपदा किंवा इतरांच्या व्यक्तिगत हक्कांचे उल्लंघऩ टाळण्याची किंवा कायद्याचे किंवा विनियमकांचे उल्लंघन टाळण्याची संपूर्ण जबाबदारी घेता. आपली माहिती Quora च्या स्वीकारार्य वापर धोरण, कॉपीराईट धोरण, ट्रेडमार्क (व्यापारचिन्ह) धोरण, प्रकाशित केलेली अन्य Quora धोरणे, किंवा अन्य कोणतेही लागू असलेले कायदे किंवा विनियमके यांचे उल्लंघन होणार नाही याबद्दल खात्री करण्यासाठी आपण जबाबदार असाल. आपल्या माहितीच्या कारणाने कोणत्याही व्यक्तीला सर्व रॉयल्टीज, फी, आणि अन्य कोणतेही पैसे देणे असल्यास ते देण्याचे आपण मान्य करता.
 4. आमची माहिती आणि साहित्य
  1. आमच्या माहिती आणि साहित्याची व्याख्या. Quora व्यासपीठावरील सर्व बौद्धिकसंपदा आणि Quora व्यासपीठाशी संबंधित (खास करून, मात्र आमच्या सॉफ्टवेअरशी मर्यादित नाही, Quora चिन्हे, Quora लोगो, मात्र तुमची माहिती वगळून) ही Quora Inc. ची किंवा तिच्या उपकंपन्या आणि तिच्या सहयोगी, किंवा अन्य Quora वापरकर्त्यानी पोस्ट केलेली माहिती ही आम्हाला (एकत्रितरित्या “आमची माहिती आणि साहित्य”) अनुज्ञप्तित केलेली आहे.
  2. माहिती. Quora ने आपल्या किंवा इतरांच्या Quora व्यासपीठाच्या वापरातून गोळा केलेला (“डेटा”), सर्व डेटा हा Quora Inc., तिच्या उपकंपन्या, आणि सहयोगी यांची मालमत्ता आहे. अधिक स्पष्टतेसाठी, दिलेल्या माहितीमध्ये आपल्या माहितीचा समावेश नाही आणि ती आमच्या माहिती आणि साहित्य यापासून वेगळी असेल.
  3. आमच्याकडून आपणास दिला जाणारा परवाना.
   1. आम्ही आपणाला आमची माहिती आणि साहित्य आणि डेटा, जसा Quora व्यासपीठावर उपलब्ध करून दिला जाईल त्याच्या Quora व्यासपीठावरील आपल्या वापराच्या जोडणीसह तसा, या करारनाम्याच्या अटी आणि शर्ती यांच्या अधीन राहून, वापरण्यास आणि तो वापरण्याचा मर्यादित, सर्वसाधारण परवाना मंजूर करत आहोत.
   2. Quora आपणाला आमची माहिती आणि साहित्य वेब वर कोठेही पुन्हा-पोस्ट करण्यासाठी वैश्विक, रॉयल्टी मुक्त, मागे घेता येण्याजोगा, अभिनियुक्त- न करता येण्याजोगा आणि सर्वसाधारण(नॉन-एक्स्लुझिव्ह) परवाना देत आहे, मात्र : (अ) प्रश्नातित असलेली माहिती Quora व्यासपीठावर एप्रिल 22, 2010 नंतर समाविष्ट करण्यात आलेली आहे; (ब) ज्या वापरकर्त्याने माहिती तयार केली आहे त्याने स्पष्टपणे माहिती ही Quora व्यासपीठावर पुर्ऩउत्पादनासाठी नाही हे स्पष्टपणे चिन्हित केलेले नाही; (क) आपण माहितीमध्ये दुरूस्ती करू शकत नाही; (ड) आपण ऍट्रिब्युट Quora चे वाचता येण्याजोग्या मजकूरामध्ये नामनिर्देश करून आणि http://quora.com वर ज्यामध्ये आमची माहिती आणि साहित्य याचा समावेश आहे त्या पृष्ठावर जिथे मूळ माहितीचा स्त्रोत उपलब्ध आहे तिथून घेऊन जाणाऱ्या मानव आणि मशिन-ने फॉलो करता येण्याजोग्या लिंकने (एक HTML <a> अँकर टॅग) आमची माहिती आणि साहित्य प्रदर्शित होणाऱ्या पृष्ठाकडे परत घेऊन जाण्यास लिंक कराल; (इ) Quora किंवा एका वापरकर्त्याद्वारे विनंती केल्यानंतर, आपण वापरकर्त्याचे नाव जे वापरकर्त्याने परिणामस्वरूप ऩिनावी ठेवलेले आहे ते माहितीमधून आपण काढाल; (फ) Quora किंवा एका वापरकर्त्याने ज्याने Quora व्यासपीठावर नवीनतम आवृत्तीवर माहितीच्या विशिष्ट तुकड्याला अद्ययावत करण्यासाठी वाजवी प्रमाणात योगदान देण्याचा प्रयत्न केलेले आहेत, त्यांनी विनंती केल्यावर आपण काढाल; आणि (ग) Quora किंवा एका वापरकर्ता यांच्यापैकी एकाने, ज्याने आपल्या माहितीमध्ये योगदान दिले आहे, त्यांच्या विनंतीवर, आपण जी माहिती Quora व्यासपीठ पुन्हा उत्पादित करण्यासाठी नाही ते काढून टाकण्याचा किंवा वाजवी प्रमाणात काढण्याचा प्रयत्न कराल; (ह) आपण आमची माहिती आणि साहित्य याचा लहान भागापेक्षा जास्च भाग पुर्न प्रकाशित करणार नाही. या अधिकारांचा उपयोग करून, आपण Quora, किंवा कोणत्याही Quora वापरकर्त्यांद्वारे, स्पष्टपणे किंवा अस्पष्टपणे कोणतीही जोडणी ठामपणे करणे, पुरस्कृत करणे किंवा वेगळी पृष्ठांकीत करून, आमच्याकडून लिखितपूर्व परवानगी न घेता, करू शकणार नाही.
   3. आम्ही आमच्या परवान्याला कोणत्याही वेळी कोणत्याही कारणासाठी समाप्त करू शकतो. आमच्याकडे Quora व्यासपीठावरील कोणतीही माहिती वितरीत करण्यास नकार देण्याचा किंवा काढून टाकण्याचा अधिकार आहे, मात्र तसे करणे बंधनकारक नाही. या अटीमध्ये मंजूर करण्यात आलेल्या अधिकार आणि परवाना यांशिवाय, आम्ही इतर सर्व अधिकार राखून ठेवतो आणि अन्य कोणतेही लागू केलेले वा अन्य अधिकार किंवा परवाने, मंजूर करीत नाही.
  4. परवानगी असलेला वापर. आपण जर एक सर्च (शोध) इंजिन, वेब्र क्राऊलर, बॉट स्क्रॅपिंग टूल, डेटा मायनिंग टूल, बल्क डाउनलोडिंग टूल, विजेट सुविधा, किंवा त्याचप्रकारचे डेटा संकलित करण्याचे किंवा विस्तारित करण्याचे साधन ऑपरेट करीत असल्यास, खालील अतिरिक्त नियमांचे पालन करण्याच्या अधीन राहून, आपण Quora प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता: i) आपणाला एक वर्णनात्मक युझर एजंट हेडर वापरणे आवश्यक आहे; ii) आपण नेहमी robots.txt मध्ये दिलेल्या माहितीचे अनुसरणकरणे आवश्यक आहे; iii) आपला वापर Quora व्यासपीठाच्या कार्याला कोणत्याही दृष्टिने प्रतिकूल रितीने प्रभावित करता कामा नये; आणि iv) आपणाशी कसा संपर्क साधावा, याबद्दल आपल्या युझर एजंट स्ट्रिंगमध्ये, किंवा जर आपणाकडे वेबसाईट असल्यास आपल्या वेबसाईटवर तसे स्पष्ट करणे आवश्यक आहे.
  5. कोणतीही मान्यता किंवा पडताळणी नाही. Quora व्यासपीठावर थर्ड पार्टीकडील माहितीला, उत्पादनांना आणि सेवांच्या वापर करत येऊ शकतो व Quora आपणास थर्ड पार्टीशी संवाद साधण्यास मदत करते, याची कृपया नोंद घ्या. Quora व्यासपीठावर सहभागी होणे किंवा उपलब्ध असणे ह्याविषयी आमच्याद्वारे कोणतेही अनुमोदन किंवा पुष्टीकरण पडताळणी केली जात नाही. आम्ही Quora व्यासपीठावर पोस्ट केलेल्या कोणत्याही माहितीच्या अचूकतेची, पूर्णत्वाची, किंवा यथाकालत्वाची कोणतीही हमी देत नाही किंवा त्याचे प्रतिनिधीत्व करीत नाही.
  6. मालकी. आमची माहिती आणि साहित्य Quora च्या वापरकर्त्यांची किंवा Quora ची मालमत्ता राहील हे आपण कबूल करता आणि त्यासाठी संमती देता. Quora व्यासपीठावर उपलब्ध करून दिलेली माहिती, बातमी आणि सेवा या यु.एस. (अमेरिकन) आणि आंतरराष्ट्रीय कॉपीराईट, व्यापारचिन्ह (ट्रेडमार्क), आणि अन्य कायद्यांद्वारे संरक्षित आहेत आणि हे अधिकार वैध आणि अंमलबजावणी करण्याजोगे आहेत हे आपण कबूल करता.
 5. एकात्मिक सेवा प्रदाता

  आपण दुसरा ऑनलाईन सेवा प्रदाता, जसे सोशल नेटवर्किंग सेवा (“एकात्मिक सेवा प्रदाता”), आपल्या Quora व्यासपीठावरील आपल्या खात्यामध्ये थेटपणे समाविष्ट करण्यासाठी कार्यान्वित करू शकता. एकात्मिक (इंटिग्रेटेड) सेवा सक्षम करून, आपण एकात्मिक सेवा प्रदात्याला, आपली लॉग-इन माहिती आणि अन्य वापरकर्त्यांची माहिती, त्यांच्याकडे हस्तांतरीत करण्यास आणि त्यांच्याकडून प्राप्त करण्यास आम्हाला अनुमती देत आहात. Quoraच्या वापराबद्दस, संग्रहणाबद्दल, तुमच्याशी संबंधित माहितीला प्रकट करणे आणि Quoraच्या आतील एकात्मिकसेवा यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या गोपनीयता धोरण लिंकवर क्लिक करून त्याविषयी माहिती घ्या. आपल्याकडून होणाऱ्या कोणत्याही एकात्मिकसेवा प्रदात्याचा वापर आणि त्याचे स्वतःचे स्वयंमाहिती आणि माहिती हाताळणे हे केवळ त्यांच्या वापराच्या अटी, गोपनीयता धोरणे, आणि अन्य धोरणे याद्वारे नियंत्रित केल्या जातील हे लक्षात ठेवा.
 6. Quora व्यासपीठावर काही विशिष्ट गोष्टी देऊ करण्याबद्दल अधिक माहिती
  1. सारसंग्रह. आपण Quoraव्यासपीठासाठी जेव्हा साईनअप करता, तेव्हा तुमच्या प्रश्नांच्या सर्वोत्तम उत्तराची पावती, आणि आपणाला स्वारस्य असू शकलेली उत्तरे यांच्या समावेशासहची सेवा आहे. आपण आपल्या सर्वोत्तम उत्तराची पावती न मिळण्याच्या पर्यायाला स्वीकारू शकता, आणि पत्रव्यवहाराच्या अन्य सेटिंग्जना, आपल्या खाते प्रोफाईलमध्ये “ईमेल आणि अधीसूचना” मध्ये, जसे आमच्या गोपनीयता धोरणा मध्ये अधिक वर्णन करून सांगण्यात आले आहे त्याप्रमाणे, जाऊऩ अॅडजेस्ट करू शकता.
  2. जाहिराती. Quora व्यासपीठावर जाहिरातींचा, ज्यामध्ये Quora व्यासपीठावरील माहिती किंवा बातमी, Quora व्यासपीठाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या क्वेरी (चौकश्या), किंवा अन्य माहिती, जी आपणाला संबद्ध बनविण्याच्या प्रयत्नामध्ये लक्ष्य करण्यात आलेली, यांचा समावेश असू शकतो. Quora द्वारे दिल्या जाणाऱ्या जाहिरातींचा प्रकार आणि मर्यादा यांमध्ये बदल केला जाऊ शकतो. Quora व्यासपीठामध्ये प्रवेश आणि वापर करण्यास तुम्हाला देऊ करण्याच्या Quora च्या मंजूरीचा विचार करता, आपण Quora आणि त्यांचे इतरपक्ष प्रदाते आणि भागिदार हे Quora व्यासपीठावर अशा जाहिराती ठेवू शकतात. हे आपणाला मंजूर आहे. आपण जाहिरातदार बनू इच्छित असल्यास, Quora व्यासपीठावर जाहिराती सेवा प्रदान करण्यासाठी आपण आमच्या वेगळ्या आणि पूरक अटी मान्य करण्याची आवश्यकता आहे.
  3. कायदेशीर, वैद्यकीय आणि अन्य व्यावसायिक योगदानकर्ते. माहिती पोस्ट करणारे काही वापरकर्ते कायदे विषयक, वैद्यकीय, आणि अऩ्य परवानाधारक व्यावसायाचे (एकत्रितरित्या, “व्यावसायिक योगदानकर्ते”) सदस्य आहेत. व्यावसायिक योगदान कर्त्यांद्वारे पोस्ट केलेल्या माहितीवर, तुमच्या विशिष्ट परिस्थितीसाठी उचित असलेल्या कोणत्याही व्यावसायिक सल्ल्याला बदली म्हणून त्यावर विसंबून राहू नये. Quora ने विशिष्ट अस्वीकार-साचा-भाषा प्रदान केलेल्या आहेत की व्यावसायिक योगदानकर्ते त्यांची उत्तरे संपादित आणि अंतर्भूत करू शकतात. राज्य किंवा स्थानानुसार नैतिकता नियम वेगवेगळे असू शकतात. आणि व्यावसायिक योगदानकर्त्यांनी त्यांच्या व्यवसायानुसार आणि त्यांनी प्रदान केलेल्या माहितीनुसार उचित असे अस्वीकार प्रदान करावा. आणि असे ठरविण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे.
  4. बटन्स, लिंक्स आणि विजेट. Quora वरील बटणे, लिंक आणि विजेट्स यांचा वापर करण्यास, सेवा विषयक अटींनुसार (दायित्वाच्या अस्वीकार आणि मर्यादा यांच्या समावेशासह) परवानगी आहे आणि मात्र: (अ) आपला अशा बटणांचा, लिंकचा आणि विजेटच्या लिंक यांचा वापर हा फक्त Quora व्यासपीठाच्या वापराशी असेल; (ब) आपण अशा बटणे, लिंक, किंवा विजेट किंवा त्याच्याशी संबंधित कोडची कोणत्याही प्रकारे दुरूस्ती करणार नाही; (क)आपण अशी कोणत्याही बटणे, लिंक्स आणि विजेट्स वापरणार नाही जी Quora अशा वेबसाईटचे समर्थन करते, पुरस्कृत करते, किंवा शिफारस करते असे सूचित करतील किंवा ध्वनित करतात; आणि (ड) अशा बटणे, लिंक्स, आणि विजेट यांचा वापर आणि अशा बटणे, लिंक्स, आणि विजेट ज्या साईटवर ठेवल्या आहेत त्यांचा वापर Quora च्या स्वीकारार्य वापर धोरण यांचे उल्लंघन करण्यासाठी केला जाणार नाही.
  5. वेब संसाधने आणि तृतीय-पक्ष सेवा. Quora व्यासपीठ हे आपणाला अन्य संकेतस्थळाला भेट देण्याची किंवा थर्ड पार्टी उत्पादनांना किंवा सेवा वापरण्याची संधी देखील देऊ शकतो. अशा संकेतस्थळांना (वेबसाईट) किंवा संसाधनांना भेट देण्यापासून उद्भवणाऱ्या धोक्याला आपण गृहित धरू शकता.
  6. वेगळया करारनाम्याची आवश्यकता आहे अशा सेवा. काही खास वैशिष्ट्ये किंवा सेवांचा वापर करण्यापूर्वी आपण एक वेगळा आणि पूरक लेखी करार करण्याची आवश्यकता असते.
 7. आपल्या बौद्धिक संपदा अधिकाराचा, Quora च्या धोरणाचा, किंवा लागू असलेल्या कायद्याच्या उल्लंघनाचा अहवाल देताना
  आमच्याकडे आपल्या बौद्धिक संपदा अधिकार किंवा Quora च्या धोरणांचे अन्य उल्लंघने किंवा लागू असलेल्या कायद्यांच्या उल्लंघनाचा अहवाल देण्याच्या प्रक्रियेसाठी विशेष प्रक्रिया आहे.
  1. कॉपीराईट (स्वामीत्व हक्क) धोरण आणि व्यापारचिन्ह (ट्रेडमार्क) धोरण. आम्ही कॉपीराईट धोरण आणि ट्रेडमार्क (व्यापारचिन्ह) धोरण स्विकारले व लागू केलेले आहे. Quora व्यासपीठावरील माहितीमुळे आपल्या बौद्धिक संपदा अधिकाराचे उल्लंघन झाले आहे असे जर वाटत असेल तर तक्रार घेण्यासाठी विनंती कशी करावी याबद्दल अधिक तपशीलवार माहितीच्या समावेशासह, अधिक माहितीसाठी, कृपया आमचे कॉपीराईट धोरण आणि व्यापारचिन्ह (ट्रेडमार्क) धोरण वाचा. आपल्या सोयीसाठी, आम्ही आपणाला पुढील कॉपीराईट उल्लंघन दावा आवेदनपत्र, व व्यापारचिन्ह (ट्रेडमार्क) उल्लंघन दावा आवेदनपत्र देऊ, ज्यांचा, जसा लागू असेल तसा, वेगवान प्रक्रियेसह आपण वापर करू शकता.
  2. अन्य उल्लंघनांना कळविणे. जर आपणाला असे वाटत असेल की Quora च्या व्यासपीठाकडून स्वीकारार्य वापर धोरणाचे उल्लंघन होत आहे. किंवा अन्यथा लागू असलेल्या कायद्याचे (कॉपीराईट किंवा ट्रेडमार्क (व्यापारचिन्ह) यांच्या उल्लंघऩाशिवाय) किंवा Quora च्या अन्य धोरणांचे उल्लंघन करीत आहे, आपण पुढील अन्य उल्लंघनांच्या दाव्याचे आवेदनपत्र (फॉर्म) भरू शकता. आपण व्यक्तिशः आक्षेपार्ह किंवा आक्रमक असल्याचे आम्हाला आढळून आल्यास आम्हावर माहित काढून टाकण्यावर कोणतेही बंधन नाही. माहिती काढून टाकणे, आमच्या धोरणांशी आणि लागू असलेल्या कायद्याशी सुसंगत राहण्यासाठी आलेल्या विनंत्यांना तत्काळ प्रतिसाद देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
 8. दायित्वांचा अस्वीकार आणि मर्यादा

  कृपया हा विभाग अतिशय काळजीपूर्वक वाचा कारण तो Quora एन्टिटी च्या तुमच्याबद्दल असलेल्या मर्यादित दायित्वाला दर्शवितो.

  “QUORA एन्टिटी” चा अर्थ आहे QUORA INC. आणि तिच्या कोणत्याही उपकंपन्या, सहयोगी, संबंधित कंपन्या, पुरवठादार, परवानाधारक, आणि भागिदार, आणि तिचे अधिकारी, संचालक, कर्मचारी, एजंट्स आणि त्या प्रत्येकाचे प्रतिनिधी. खालील प्रत्येक तरतूद ही लागू असलेल्या कायद्याच्या अंतर्गत परवानगी असलेल्या कमाल मर्यादेपर्यंत लागू होते.
  1. आम्ही आपणाला QUORA व्यासपीठ, आमची माहिती आणि साहित्य यांच्यासोबत आणि इतरांशी जोडून घेण्याची संधी यासह, जसे आहे आणि जसे उपलब्ध आहे त्या आधारावर, कोणत्याही प्रकारची हमी, व्यक्त किंवा लागू न करता, प्रदान करत आहोत. QUORA कंपनी कोणतीही आणि सर्व, हमी आणि व्यापार करता येण्याजोग्या स्थिती, शिर्षक, अचूकता, आणि पूर्णत्व, विनाव्यत्यय किंवा त्रुटी-मुक्त सेवा, एक विशिष्ट उद्देशासाठी योग्यता, आनंद, उल्लंघन नसलेले, आणि सौदा करण्याच्या किंवा व्यावसायिक वापराच्या दरम्यान उभ्या राहणाऱ्या कोणत्याही हमी, यांच्यापर्यंत पूर्वगामी मर्यादित करते.
  2. QUORA कोणत्याही संदर्भात वचन देत नाही, आणि त्याविषयीच्या सर्व दायित्वांना स्पष्टपणे स्वीकारत नाही: (i) थर्ड पार्टीद्वारे किंवा अन्य कोणत्याही वापरकर्त्याद्वारे पोस्ट केलेली माहिती; (ii) कोणत्याही थर्ड पार्टीची संकेतस्थळे (वेबसाईट), थर्ड पार्टी उत्पादन, किंवा Quora व्यासपीठाच्या माध्यमातून आपण प्रवेश केलेली किंवा त्यावर सूचीबद्ध केलेली थर्ड पार्टी सेवा, ज्यामध्ये एक एकात्मिक सेवा प्रदाता किंवा व्यावसायिक योगदानकर्ता यांच्य समावेशासह; (iii) QUORA व्यासपीठाचा आपल्या वापराच्या दरम्यान तुमच्यासमोर आलेल्या थर्ड पार्टीची गुणवत्ता किंवा वागणूक; किंवा (iv) आपल्या माहितीमध्ये बदल किंवा वापर, अनधिकृत प्रवेश. QUORA कोणतीही हमी देत नाही की: (a) QUORA व्यासपीठ आपल्या प्रतिनिधीची भेट घेईल; (ब) QUORA व्यासपीठ हे विना व्यत्यय, वेळेवर सुरक्षित किंवा त्रुटी-मुक्त असेल; (c) QUORA व्यासपीठाचा वापर करून आपण प्राप्त केलेली माहिती किंवा परिणाम, एक व्यावसायिक योगदानकर्ता, किंवा अऩ्य कोणताही वापरकर्ता हा अचूक किंवा विश्वसनीय असेल; किंवा (d) कोणत्याही उत्पादनाची गुणवत्ता, सेवा, माहिती, किंवा QUORA व्यासपीठाचा वापर करून आपण प्राप्त केलेली किंवा खरेदी केलेले अन्य साहित्य हे समाधानकारक असेल.
  3. दायित्वाच्या कोणत्याही सिद्धांताखाली QUORA कंपनी कायद्याने परवानगी दिलेल्या कमाल मर्यादेपर्यंत आपणास बांधील नाही. पूर्वगामी असलेल्या पर्यंतच्या मर्यादेपर्यंत न राहता तुम्ही मान्य केले आहे की, QUORA कंपनी विशिष्ट प्रकारे कोणत्याही प्रकारे अप्रत्यक्षपणे, घटनेने, परिणामस्वरूप, विशेष. किंवा उदाहरणात्मक इजा, किंवा फायद्याचे नुकसान व्यवसायामध्ये व्यत्यय, लौकिकाची हानी, किंवा मापितीची हानी (जरी आम्ही अशा हानीच्या शक्यतेची सल्ला दिला असला तरी देखील किंवा अशी हानी पुढे दिसत असली तरी देखील), QUORA प्लॅटफॉर्मच्या आपल्या वापरातून कोणत्याही प्रकारे किंवा त्यातून उद्भवणारी, किंवा वापर करण्यास असमर्थता.
  4. QUORA व्यासपीठाच्या असमाधानकारक वापरावरील एकमेव उपाययोजना म्हणजे QUORA व्यासपीठाचा वापर करण्यास थांबविणे.
  5. पूर्वगामी असल्यापर्यंतच्या मर्यादेपर्यंत न राहता, QUORA चे आपण QUORA व्यासपीठाच्या वापराने आपली होणारी हानी किंवा तोटा किेंवा हा करारनामा हा QUORA ला QUORA व्यासपीठ वापरण्याच्या संदर्भात देय केलेल्या रक्कमेपर्यंत दायित्वाचे उगम करणाऱ्या कृतीच्या आधीच्या बारा (12) महिन्याच्या पूर्वीपर्यंत ते आपणासाठी असलेले कमाल सरासरी दायित्व आहे.
  6. काही अधिकारिता, लागू केलेल्या हमीवर मर्यादेची किंवा काही विशिष्ट प्रकारच्या हानीसाठी दायित्वाच्या वगळण्याची अनुमती देत नाही. त्याचा परिणामस्वरूप, वरील मर्यादा किंवा वगळणे हे आपणाला संपूर्णपणे किंवा काही भागामध्ये लागू होऊ शकते, आणि पूर्वगामी विभाग 8 (क), आणि 8 (ई) हा न्यू जर्सीच्या रहिवाश्यांसाठी QUORA दुर्लक्षाने, कपटपूर्ण, बेफामपणा, किंवा जाणीवपूर्वक दुर्वर्तन यांचा परिणाम म्हणून पोहचलेल्या हानीच्या मर्यादेपर्यंत, लागू होणार नाही.
 9. नुकसान भरपाई

  आपण मान्य केले आहे की Quora कंपनीचा सर्व प्रकारच्या थर्ड पार्टी दावे आणि खर्च (वकिलांच्या वाजवी फिच्या समावेशासह) जो ज्याच्यातून उद्भवत आहे किंवा ज्याच्याशी संबंधित आहे, त्याला सोडविणे, नुकसान भरपाई देणे, आणि त्यांचा बचाव करणे: i) Quora व्यासपीठाचा आपला वापर, ii) आपली माहिती, iii) Quora व्यासपीठाच्या अन्य वापरकर्त्यासह आपला व्यवहार किंवा वागणूक, किंवा iv) या करारनाम्याच्या कोणत्याही भागाचे आपल्याकडून होणारे उल्लंघन. आम्ही आपणाला अशा दाव्यांविषयी तत्परतेने सूचना देऊ आणि (आमच्या खर्चाने) आम्ही दाव्याचा बचाव करण्यात वाजवी प्रमाणात सहाय्य देखील करू. आपणाला बचावामध्ये सहभागी होण्यासाठी अनुमती दिली जाईल आणि आमच्या लेखी परवानगीशिवाय आपण अशा कोणत्याही दाव्याचा समझोता करणार नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने आपल्याद्वारे होणाऱ्या नुकसान भरपाईच्या अधिन राहून कोणत्याही बाबीच्या खास बचावाला गृहित धरून अधिकार राखून ठेवतो. अशा घटनेमध्ये, आपणाकडे त्याबाबीबाबत आमचा बचाव करण्याचे आपल्या पुढे कोणतेही बंधऩ असणार नाही.
 10. विवाद उपाययोजना

  हा करारनामा आणि Quora व्यासपीठाचा आपणाकडून वापर करून उद्भवलेली कोणतीही कृती यांना कॅलिफोर्निया राज्याच्या कायद्याने, कायद्याच्या तरतुदीने तिच्यातील संघर्षाच्या ठिकाण, किंवा आपले राहण्याचे राज्य किंवा देश यांच्या संदर्भाशिवाय, नियंत्रित केले जाईल. जसे खालील परिच्छेदामध्ये सेट करण्यात आले आहे त्याप्रमाणे लवादाला सादर केल्याशिवाय, सर्व दावे, कायदेशीर प्रक्रिया किंवा आपल्या Quora व्यासपीठाच्या वापरातून उत्पन्न होणारे वाद, आणि आपली या अधिकारितेला संमती आणि अशा न्यायालयाचे स्थळ आणि कोणत्याही असुिधाकारक मंचाला असलेल्या आक्षेपाला रद्द करून ते हे फक्त सॅन्टा कार्ला काऊंटी, कॅलिफोर्निया मध्ये आणले जातील. या करारनाम्याखालील कोणत्याही दाव्यासाठी ( निषेधाज्ञा किंवा अन्य समन्यायी सहाय्य वगळून), जिथे मिळणाऱ्या आदेशाची एकूण रक्कम ही $10,000 युएसडी पेक्षा कमी असेल, सहाय्याची विनंती करणाऱ्या पक्ष प्रत्यक्ष हजर न राहता लवादाच्या माध्यमातून विवादाला सोडण्याची निवड करू शकतात. अशा लवादाची निवड करणारा पक्ष हा लवादाला एका रुढ पर्यायी विवाद उपाययोजनेच्या (एडीआर) च्या माध्यमातून आरंभ करेल. ADR प्रदाते आणि पक्ष यांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे: अ) लवाद हा टेलिफोन, ऑनलााईन आणि /किंवा आणि / किंवा लिखित सादर केलेल्याच्या आधारावर असेल, जसे लवादाला आरंभ करणाऱ्या पक्षाद्वारे निवडलेले असेल; ब) अन्यथा पक्षांनी परस्पर सहमत नसल्यास मध्यस्थी पक्ष किंवा साक्षीदारांद्वारे कोणतीही वैयक्तिक दृष्ट्या हजर राहण्याचा समावेश असणार नाही; आणि क) लवादाने प्रदान केलेल्या निकालालासक्षम न्यायक्षेत्राच्या कोणत्याही न्यायालयामध्ये नोंदवला जाऊ शकतो.
 11. सर्वसामान्य अटी
  1. या अटीमध्ये बदल. आम्ही करारनाम्यामध्ये सुधारणा/दुरूस्ती (गोपनीयता धोरण, स्वीकारार्य वापर धोरण, कॉपीराईट धोरण, आणि ट्रेडमार्क धोरण यासारख्या कोणत्याही धोरणांमध्ये जी या करारनाम्यात अंतर्भूत करण्यात आलेली आहेत) त्यामध्ये कोणत्याही वेळी, आमच्या स्वेच्छेने, करू शकतो. आम्ही या करारनाम्याच्या महत्वाच्या अटी दुरूस्त करू, ज्या आम्ही जेव्हा आपणाला नोटिस पाठवू तेव्हा कार्यरत होतील. अशा सूचना Quora व्यासपीठ आणि अन्य स्वरुपामध्ये, आम्हाकडून स्वेच्छेने आणि अधिसूचनेचे स्वरूपामध्ये : ईमेल, पोस्ट केलेल्या सूचना, या मार्गे असेल. आपण येथे आमचा करारनामा आणि आमची मुख्य धोरणे कोणत्याही वेळी पाहू शकता. दुरूस्तीची अधिसूचना प्राप्त झाल्यानंतर, आपले खाते रद्द करणे, किंवा Quora व्यासपीटाचा वापर थांबविणे, यामध्ये आपणाला आलेले अपयश, आपणावर या दुरूस्त्यांना स्वीकारण्यास बंधनकारक करेल. जर आपणाला या दुरूस्त्या मान्य नसतील किंवा या कराराच्या कोणत्याही अटी आपणाला मान्य नसतील तर त्यावरील एकमेव उपाय हा आपले खाते रद्द करणे किंवा आपला Quora व्यासपीठाचा आपण करीत असलेला वापर थांबविणे हा आहे.
  2. वापरले जाणारे कायदे आणि अधिकार आपण मान्य केले आहे की Quora ही अमेरिकेतून चालविली जात आहे आणि असे मानण्यात येईल की ती फक्त कॅलिफोर्नियामध्ये स्थित आहे आणि अधिकार विश्लेषणाच्या उद्देशासाठी ती एक सकारात्मक सेवा आहे. कोणत्याही दाव्यासाठी लवाद लागू करणे अनावश्यक आहे, आपण मान्य केले आहे की असे दावे हे सॅन्टा क्लॅपा काऊंटी, कॅलिफोर्निया, येथील संघराज्यीय किंवा राज्य न्यायालयात कोणत्या कायद्याच्या तरतुदीच्या संघर्षाच्या संदर्भाशिवाय आणले जाईल.
  3. अमेरिकेबाहेर वापर. Quora व्यासपीठ हा अमेरिकेच्या बाहेर लागू असलेले कायदे आणि विनियमके यांचे पालन करण्याचे Quora स्पष्टपणे प्रतिनिधीत्व किंवा हमी घेणे अस्विकृत करते आपण जर अमेरिकेबाहेर Quora व्यासपीठाला वापरीत असल्यास, आपण वेगवेगळ्या कायद्यांचे, विनियमकांचे, किंवा रूढीपरंपराचे, आपल्या Quora व्यासपीठाच्या वापरासंबंधात लागू शकतात, त्यांचे पालन ठरवून करण्यास जबाबदार असाल.
  4. निर्यात. Quora व्यासपीठ हे आमच्या कॅलिफोर्निया येथे स्थित असलेल्या अमेरिकेतील कार्यालयातून नियंत्रित केले आणि चालविले जाते. Quora सॉफ्टवेअर हे अमेरिकेच्या निर्यात नियंत्रणाच्या अधीन आहे. लागू असलेल्या कोणत्याही कायदा किंवा निनियमकाचे उल्लंघन करत Quora साठी कोणत्याही सॉफ्टवेअरला डाउनलोड किंवा/अन्यथा निर्यात किंवा पुर्न-निर्यात करावे लागत नाही. आपण त्याचे प्रतिनिधीत्व करता की जे (1)अशा देशामध्ये राहत नाही ज्याच्यावर अमेरिकन सरकारची व्यापारबंदी आहे, किंवा अमेरिकन सरकारने त्या देशाला “दहशतवादाला मदत करणारा देश” म्हणून ठरविलेले आहे, आणि (2) अमेरिकन सरकारच्या कोणत्याही प्रतिबंधित सूचीमध्ये किंवा निर्बधित पक्षांच्या सूचीमध्ये सूचीबद्ध केलेला नाही.
  5. अॅप्लिकेशन आणि मोबाईल डिव्हाइसेस. आपण जर Quora व्यासपीठ एका Quora अऩुप्रयोगाच्या (अॅप्लिकेशन) माध्यमातून वापरत असल्यास, आपण मान्य करता की हा करार फक्त आपल्या आणि Quora मध्ये आहे, आणि अन्य दुसऱ्या अऩुप्रयोग (अॅप्लिकेशन) सेवा प्रदात्याच्या किंवा अनुप्रयोग (अॅप्लिकेशन) व्यासपीठ प्रदात्याच्या( जसे की Apple Inc. किंवा Google Inc.) जे त्यांच्या स्वतःच्या अटीच्या अधीन राहून आपल्याला अनुप्रयोग (अॅप्लिकेशन) प्रदान करू शकतात. आपण ज्या मर्यादेपर्यंत Quora व्यासपीठाला एका मोबाईल डिव्हाइसमार्फत वापरू शकता, त्याला तुमच्या वायरलेस कॅरियरचे मानक शुल्क, माहिती (डेटा) दर, आणि अन्य फी देखील आकारली जाऊ शकते.
  6. टिकाव धरणे. खालील तरतुदी या करारनाम्याच्या कालबाह्य होण्यास किंवा रद्द होण्यास टिकवून धरतील: विभाग 2(इ)(रद्द), 2(ग)(अभिप्राय), विभाग 3(आपली माहिती), विभाग4(अ)-(ब) आणि (ड)-(फ)(आमची माहिती आणि साहित्य), विभाग 8 (दायित्वाचा अस्वीकार आणि मर्यादा), विभाग 9 (नुकसान भरपाई), विभाग 10 (विवाद निराकरण), आणि विभाग 11 (सर्वसामान्य अटी).
  7. कॅलिफोर्नियातील वापरकर्त्यांसाठी सूचना. कॅलिफोर्निया नागरी कायदा विभाग 1789.3, अंतर्गत कॅलिफोर्निया संकेतस्थळे वापरकर्त्यांना खालील विशिष्ट ग्राहक अधिकार सूचना देऊ करण्यात आलेल्या आहेत. Quora व्यासपीठ हे Quora Inc., कॅलिफोर्निया येथे स्थित असलेल्या माउंटन व्ह्यूद्वारे प्रदान करण्यात आलेले आहे. आपणाला Quora व्यासपीठासंदर्भात काही प्रश्न किंवा तक्रार असल्यास, कृपया Quora शी support@Quora.com येथे संपर्क साधा. कॅलिफोर्नियाचे रहिवासी 1625 एन येथे ग्राहक व्यवहार विभागात ग्राहक माहिती विभाग येथे संपर्क करू शकता. मार्केट बीएलव्हिडी, स्यूट एस-202, सॅक्रामेन्टो, कॅलिफोर्निया 95834, किंवा दूरध्वनीने (916) 445-1254 किंवा (800) 952-5210 येथे किंवा मूकबधीर हे टिडीडी (800) 326-2297 किंवा टिडीडी (916) 322-1700 येथे.
  8. सरकारी अंतिम वापरकर्ता. कोणतेही Quora सॉफ्टवेअर आणि संबंधित कागदपत्रे हे “व्यावसायिक बाबी,” इथे सदरची व्याख्या करायची तर §227.7202 किंवा 48 C.F.R येथे जशी संज्ञा ध्वनित करण्यात आली आहे तशी. §2.101, 48 C.F.R. मध्ये वापरण्यात आलेल्या अटीपासून “कमर्शिअल कॉम्प्युटर सॉफ्टवेअर” आणि “कमर्शिअल कॉम्प्युटर सॉफ्टवेअर डॉक्युमेन्टेशन,” जे बनलेले आहे. §12.212 किंवा 48 C.F.R. §227.7202 (जसे लागू असेल). 48 C.F.R.शी सुसंगत §227.7202 किंवा 48 C.F.R. §227.7202-1 पासून 227.7202-4 (जसे लागू असेल). कमर्शिअल कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि कमर्शिअस सॉफ्टवेअर डॉक्युमेटेशन हे यु.एस. शासन आणि वापरकर्ते ज्यांना लायसन्स प्राप्त झालेलेः (i) फक्त व्यावसायिक आयटेमम्हणून; आणि (ii) या करारनाम्यानुसार फक्त अन्य सर्व अंतिम वापरकर्त्यांना मंजूर करण्यात आलेल्या अधिकाराप्रमाणे.
  9. नियुक्ती. आपण या करारनाम्याला (किंवा या करारनाम्याखालील तुमच्या कोणत्याही अधिकारांना किंवा दायित्वांना) आमच्या लिखित पूर्वपरवानगीशिवाय नियुक्त. किंवा हस्तांतरीत करू शकणार नाही; पूर्वगामी पालन केल्याशिवाय नियुक्त करण्याचा किंवा हस्तांतरित करण्याचा केलेला असा कोणताही प्रयत्न हा निरर्थक असेल. आम्ही हा करारनामा मुक्तपणे नियुक्त, किंवा हस्तांतरित करू. हा करारनामा पक्षांना आणि त्यांच्या संबंधीत कायदेशीर प्रतिनिधी, वारस, आणि अभिनियुक्त यांना बांधील आणि बंधनकारक असतो.
  10. इलेक्ट्रॉनिक पत्रव्यवहार. तुम्हाला या करारनाम्याने आणि त्यात लागू असलेल्या कायद्याने आमच्याकडून ईमेलद्वारे पत्रव्यवहार प्राप्त करण्यास संमती दिली आहे. सर्व करारनामे, सूचना, प्रकटने आणि अन्य पत्रव्यवहार जो आम्ही तुम्हाला इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रदान करू तो कोणत्याही कायदेशीर आवश्यकता ज्या अशा पत्रव्यवहाराला लिखित स्वरूपात पूर्ण करतील, याची तुम्ही पोच दिली आहे.
  11. संपूर्ण करारनामा/ विभागणी. हा करारनामा Quora च्या संदर्भातील मागील सर्व संज्ञा, करारनामे, चर्चा आणि लिखाणे आणि आपल्याशी आणि आमच्यातील Quora व्यासपीठाच्या संदर्भा दरम्यानच्या संपूर्ण कराराची रचना करतो (अपवाद, या करारनाम्यामध्ये भर म्हणून आमच्यासोबत असलेल्या लिखित कराराला वेगळे करण्यासाठी आवश्यक असलेल्या सेवांना वगळून). या करारातील कोणत्याही तरतूदीमध्ये लागू न करता येण्याजोगी प्रवर्तनीयता आढळून आल्यास, ती तरतूद उरलेल्या तरतुदींच्या प्रवर्तनीयतेवर परिणाम करणार नाही, जी पूर्णपणे लागू आणि अंमलात आणली जाईल.
  12. स्पष्टीकरण. या करारनाम्याच्या अटींना तयार करताना किंवा स्पष्टीकरण सांगताना: (i) या करारनाम्यातील मथळे हे फक्त सोयीसाठी आहेत, आणि ते विचारार्थ घेतले जाणार नाही आणि (ii)कोणत्याही गृहितकाने या करारनाम्याच्या मसुदा तयार करण्याच्या तिच्या समुपदेशकांच्या भूमिकांचा परिणाम म्हणून दोन्ही पक्षांच्या लाभात असणार नाही.
  13. सूचना. या करारनाम्याखाली आवश्यक किंवा परवानगी असलेल्या सर्व सूचना, या करारनाम्यामध्ये निर्देशित केल्या असल्याशिवाय अन्यथा, वैध असण्याकरता फॉलो करण्यासाठी लिखित स्वरूपात पाठविणे आवश्यक आहे: (i) जर तुम्ही, आपल्या खात्याशी संबंधीत असलेल्या पत्त्यावर ईमेल द्वारे, आणि (ii) जर तुमच्याद्वारे आम्हाला, Legal@Quora.com मार्गे कळविल्यास. टीसूचना देण्यात आल्या आहेत असे मानण्यात येईल (अ) तुम्हासाठी, जेव्हा ईमेल केली जाईल, आणि (ब) आम्हासाठी, ती प्राप्त झाल्यावर.
  14. संबंध. हा करारनामा तुमच्या आणि आमच्यामध्ये कोणताही संयुक्त उपक्रम, एजन्सी, भागिदारी, किंवा कोणत्याही स्वरूपातील संयुक्त उपक्रम निर्माण करीत नाही. असे अपवाद या ठिकाणी स्पष्टपणे प्रदान करण्यात आलेले आहे, कोणत्याही पक्षाला दुसऱ्याच्यावतीने कोणतेही दायित्व किंवा कर्तव्य तयार करण्याचा, व्यक्त करण्याचा किंवा ध्वनित करण्याचा अधिकार, सामर्थ्य, किंवा प्राधिकार नाही.
  15. सवलत. कोणत्याही अटीच्या हक्कांचे विसर्जन हे अशा अटींचे किंवा अन्य कोणत्याही अटींचे पुढील किंवा येऊ घालणाऱ्या क्षमा करण्याला पुढे किंवा पुढे सुरू ठेवणार नाही. आमच्या या करारनाम्याखालील अधिकाराला किंवा तरतुदीला ठामपणे पूर्ण करण्याच्या अपयशाला अशा अधिकारांचा किंवा तरतुदीचा हक्क विसर्जित करणे नसेल.
  16. अतिरिक्त आश्वासने. आपण या करारनाम्याची मुद्रित प्रत आणि अन्य कोणतीही कागदपत्रे पूर्ण करण्यास, आणि हा करारनामा आणि या करारनाम्याखालील आपल्या कोणत्याही अधिकारांची किंवा बंधनाची पुष्टी करण्याची आणि आशयाला प्रभावीत करण्याची विनंती देखील करून, आमच्या खर्चाने कोणतीही कारवाई करण्यास संमती दिली आहे.
  17. संपर्क. आमच्यांशी quora.com/contact च्या माध्यमातून या कोणत्याही अटीबद्दल निसंकोचपणे संपर्क साधा. Quora हे, 650 कॅस्ट्रो स्ट्रिट, स्युटe 450, माऊंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया - 94041 येथे स्थित असलेले, Delaware महामंडळ आहे.